शहर तीन ग्रामीण ६
*सावंतवाडी दि.०६-:* सावंतवाडी तालुक्यातील आज नवीन ९ रुग्ण सापडले असून, शहरात ३ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात सालईवाडा भागात तीन रुग्ण सापडले असून, ग्रामीण भागात मळगाव आणि माजगाव येथे प्रत्येकी एक एक रुग्ण सापडला असून, मळेवाड येथे ४ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ७८ रुग्ण सक्रिय आहेत.
