बेरोजगारी बरोबर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडवणाऱ्या मंत्री केसरकर यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा…

रुपेश राऊळ यांच आवाहन: काजू सुपारी रोपांचे वाटप करत भगवा सप्ताहच उत्साहात केले प्रारंभ..

⚡सावंतवाडी ता.१६-: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले काम करत असताना आगामी विधानसभा विजयाचा संकल्प करा असे आवाहन करत बेरोजगारी बरोबर आरोग्याचा गहन प्रश्न असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रखडवणाऱ्या मंत्री केसरकर यांना धडा शिकवा असा आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी बोलताना दिला.

त्यांच्या हस्ते कोलगाव येथून शिवसेनेच्या भगवा सप्ताह च प्रारंभ झाला यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी संघटिका सुकन्या नरसुले वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार प्रकाश गडेकर तालुका संघटक मायकल डिसोजा जिल्हा संघटक शब्बीर मणियार युवासेना तालुकाधिकारी कौस्तुभ गावडे अशोक परब सावंतवाडी तालुका महिला संघटक भारती कासार सुनील गावडे बाळू गवस नामदेव नाईक बाळू माळकर शैलेश टिळवे माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर सौ करमळकर विद्या राणे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रुपेश राऊळ पुढे म्हणाले जनतेची सेवा आणि हृदयामध्ये स्थान मिळवण्याचे आणि मिळालेल्या पदाला प्रामाणिकपणे न्याय देण्याच्या शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब
ठाकरे यांच्या विचारांतून भगवा सप्ताह घेऊन सावंतवाडी तालुक्यामध्ये शिवसेना संपर्क यात्रा सुरू करत असून आगामी लोकसभेबरोबर येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी लोकसेवक म्हणून काम करा असे आवाहन सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले.

यावेळी बोलताना सुकन्या नरसुले म्हणाल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडवायचे आहेत आता मिळणारे 3000 किंवा दीड हजार किती दिवस मिळतील असा सवाल करून घरेलू महिलांची जशी फसवणूक केली तशीच फसवणूक हे सरकार महिलांची करत आहे मतदारसंघात उद्योगधंदे नाहीत त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे महिला बचत गटांची फसवणूक केली जात असून हक्काचा आमदार निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले यशवंत उर्फ बाळू परब यांनी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजावून घेण्यासाठी ही संपर्क यात्रा असून एकतेची मूठ बांधणीचा संकल्प करा आणि निवडणूक पीक पैशाची आमिषे जुगारून लावा असे आवाहन केले
तालुकाप्रमुख संजय गवस यांनी शिवसेना पक्ष सर्वसामान्यांचा कायम राहिला आहे त्यामुळे ही संपर्क यात्रा विजय यात्रा ठरावी यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन केले माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील गद्दारांना पाडण्यासाठी कामाला लागा असे आवाहन केले तर चंद्रकांत कासार यांनी पराभवाच्या भीतीने लाडकी बहीण योजना सुरू करण्याची नामुष्की सरकारवर आल्याची टीका केली
सुरुवातीला प्रास्ताविक तालुका संघटक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मायकल डिसूज यांनी केले
त्यानंतर शिवसैनिकांना काजू सुपारी आदी रोपांचे वाटप करण्यात आले त्यानंतर ही यात्रा कुंणकेरी आंबेगाव च्या दिशेने रवाना झाले भगवे झेंडे लावून गाड्या आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जिंदाबाद व शिवसेना जिंदाबाद च्या घोषणा देत ही यात्रा आजपासून सुरू झाली

शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान आंबेगाव कारिवडे माडखोल सांगली सावरवाड कलंबिस्त त्यानंतर वेर्ले आणि शिरशिंगे अशी एका दिवसामध्ये ही यात्रा गेली दर दिवशी एका जिल्हा परिषद मतदार संघातून ही यात्रा जाणार आहे तरी यात्रेत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे

You cannot copy content of this page