भगवान लोके:असलदे ग्रामस्थांच्यावतीने नुतन तलाठी माधुरी काबरे यांचा सत्कार..
कणकवली : असलदे गावात स्वतंत्र निर्माण झालेल्या सजेवर तलाठी मिळावी या मागणीसाठी सातत्याने प्रांताधिकारी , तहसिलदार यांच्याकडे पाठपुरावा करत होतो. गेल्या १५ दिवसांपूर्वी गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी प्रांताधिका-यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आ. नितेश राणे यांनी प्रशासनाला सूचना केली. त्याची प्रशासनाने दखल घेवून असलदे सजेसाठी नुतन तलाठी माधुरी काबरे यांना नियुक्ती दिली आहे.
तलाठी माधुरी काबरे या पुढील काळात गावात सेवा देणार असल्यामुळे शेतकरी, नागरीकांना सोयीचे होणार असल्याचे मत असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी व्यक्त केला.
यावेळी उपसरपंच सचिन परब , व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी सरपंच पंढरी वायंगणकर , माजी चेअरमन प्रकाश परब, महेश लोके , रघुनाथ लोके , देवेंद्र लोके ,प्रदीप हरमलकर, संतोष परब, वासुदेव दळवी , सोसायटी संचालक उदय परब , माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे , ग्रा.पं. सदस्य स्वप्ना डामरे , विद्या आचरेकर , तुषार घाडी , प्रविण डगरे, प्रविण डामरे , दिनेश शिंदे , ग्रामसेवक संजय तांबे , मुख्याध्यापिका विनिता सावंत, शिक्षिका अर्चना लोके , अंगणवाडी सेविका कोमल परब , आशा सेविका , भाग्यश्री नरे , साक्षी हडकर , संजना हडकर , पोलीस पाटील सावित्री पाताडे , कर्मचारी मधुसुदन परब , सायली दळवी , गौरी लोके , प्रतिक्षा परब , सत्यवान घाडी , प्रकाश वाळके , आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी नुतन तलाठी माधुरी काबरे म्हणाल्या असलदे गावातील नागरिकांना माझ्या तलाठी निवडीबद्दल जो सन्मान केला. त्याबद्दल मी ऋणी आहे.
