मडुरा गावासाठी दोन दिवस तलाठी मिळणार…

उपोषणकर्त्यांना तहसीलदारांचे आश्वासन : स्वतंत्र तलाठी देण्याच्या अटीवर उपोषण तात्पुते स्थगित..

⚡बांदा ता.१६-: मडुरा सजा साठी कायमस्वरूपी तलाठी नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. यासाठी आम्ही पाठपुरावा करू. तसेच आठवड्यातील दोन दिवस मडुरा गावामध्ये तलाठी उपलब्ध होणार, असे आश्वासन सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिले. मात्र कायमस्वरूपी स्वतंत्र तलाठी देण्याच्या अटीवर मडुरा ग्रामस्थांनी छेडलेले उपोषण तात्पुरते स्थगित केले.

मडुरा सजा साठी कायमस्वरूपी तलाठी मिळण्यासाठी मडुरा ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार यांच्याकडे मागणी केली होती. तब्बल एक महिना 11 दिवस उलटूही मागणीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडल्याचे उपसरपंच बाळू गावडे यांनी सांगितले. यावेळी सरपंच उदय चिंदरकर, माजी सरपंच विजय वालावलकर, मंडळ अधिकारी पी. एस. सावंत, प्रभारी तलाठी संदीप मुळीक, पोलीस पाटील नितीन नाईक, ग्रामपंचायत सदस्य अमोल मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते दाजी सातार्डेकर, सुशील मेस्त्री, ग्रामस्थ सुधीर नाईक, कोतवाल नाना वेंगुर्लेकर, बांदा पोलीस आदी उपस्थित होते.

माजी आमदार राजन तेली यांनी सांगितले की, आपण मडुरा ग्रामस्थांसोबत असून त्यांच्या उपोषणाला आपला पाठिंबा आहे. तसेच मडुरा तलाठी कार्यालयासाठी स्वतंत्र तलाठी देण्याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करणार असे आश्वासन मडुरा उपसरपंच बाळू गावडे यांना दिल्याचे त्यांनी सांगितले. तर उपोषणाला जिल्हा परिषद महिला बालकल्याण माजी सभापती शर्वाणी गावकर, कवठणी सरपंच अजित कवठणकर, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी आदींनी भेट दिली.

You cannot copy content of this page