मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा…

कणकवलीत फटाके फोडून आनंदोत्सव केला साजरा..

⚡कणकवली ता.१४-: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली. मात्र सदर योजनेचे अनुदान मिळणार की नाही ? याबाबत उलट सुलट चर्चा सुरू होत्या. मात्र बुधवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने चा पहिला हप्ता जमा झाला. आणि भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी जिल्हा बँकेच्या संचालक प्रज्ञा ढवण, माजी नगरसेविका मेघा गांगण, प्रियाली कोदे, पूजा माणगावकर, साक्षी वाळके, तालुका उपाध्यक्ष कणकवली संजना सदडेकर, भारती पाटील, संजीवनी पवार, सौ. तामानेकर आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page