⚡कणकवली ता.१३-: हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वागदे डंगळवाडी शाळेमध्ये, देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये, मोलाचे कार्य करणारे थोर हुतात्मे व स्वातंत्र्य सैनिक यांची वेशभूषा करून शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली काढली. तसेच, विद्यार्थ्यांकडून तिरंगा प्रतिज्ञा म्हणून घेण्यात आली.
सदर कार्यक्रमास वागदे गावचे सरपंच संदीप सावंत, लक्ष्मण घाडीगावकर , सदस्या संजना गावडे, तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक वेदिका चव्हाण, व सहकारी शिक्षिका आस्था फोंडेकर पालक, ग्रामस्थ उपस्थित होते.
