निवडणुकीच्या तोंडावर कबुलायातदार जमीन प्रश्नावर केसरकरांकडून पुन्हा फसवणूक…

डॉ.जयेंद्र परुळेकर यांचा आरोप: मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व युवकांच्या रोजगाराच्या विषयावर केसरकर पूर्णपणे अपयशी…

⚡सावंतवाडी ता.१३-: निवडणुकीच्या तोंडावर आंबोली, चौकुळ, गेळे कबुलायतदार प्रश्नी मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सांगून एक प्रकारे दिशाभूल करत केसरकर पुन्हा एकदा आंबोली, चौकुळ, गेळे वासियांची फसवणूक करत आहेत, असा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केला. दरम्यान मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल असो किंवा इतर युवकांचे रोजगारचे मुद्दे असो सगळ्याच बाबतीत केसरकर अपयशी ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाल आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

You cannot copy content of this page