एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांचे १५ ऑगस्ट रोजी यंदा पुन्हा उपोषण…

औद्योगिक क्षेत्रात जोडरस्ता आणि स्मशानभूमी जागा निश्चिती अदयाप नाही..

कुडाळ : कुडाळ औद्योगिक क्षेत्रातील जोडरस्ता व स्मशानभूमिसाठी मान्यता मिळालेली जागा निश्चित करुन देत नसल्याने एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकरी पुन्हा एकदा स्वातंत्र्यदिनी कुडाळ येथील एमआयडीसी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत. तसे पत्र प्रकल्पग्रस्त शेतकरी श्याम गावडे यांनी प्रशासनाला दिले आहे.
श्याम गावडे यांनी पात्रात म्हटले आहे, आपण दिनांक ११ मार्च २०२४ रोजी आमच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या बाबत आपल्या कुडाळ कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसलो असता आपण भुखंड क्रमांक ओएस ९ मधुन जोडरस्ता व भुखंड क्रमांक ओएस २४ मधील स्मशानभुमीसाठी ३ गुंठे जागा बाटप करण्याबाबत मान्यता मिळाली असल्याबाबतचे पत्र दिले परंतु रितसर रस्ता व स्मशानभुमी साठीचा ३ गुंठे जागेचा भूखंड देण्याबाबत आपले भूमापक अधिकारी, क्षेत्र व्यवस्थापक यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन दोन्ही मागण्या बाबत योग्य ती कार्यवाही करत नसल्याने व आपण त्यांना या बाबत तशी सुचना देत नसल्याने आणि वारंवार आपण वरीष्ठ कार्यालयास आपला प्रस्ताव पाठवला अशी पत्र देत असल्याने दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी आपल्या कुडाळ कार्यालय समोर सकाळपासुन सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना घेऊन बेमुदत उपोषणास बसणार आहे असा इशारा शाम बाळकृष्ण गावडे यांनी दिला आहे.
श्री. गावडे यांनी पुढे म्हटले आहे, आपल्या संबंधित सर्व कार्यालयाकडुन खुपच दिरंगाई होत आहे. त्यामुळे मी माझ्या मागण्यांबाबत ठाम असल्याने व प्रत्यक्ष जागेवर येऊन जागा निश्चित करुन देत नसल्याने मी माझ्या १५ ऑगस्टच्या उपोषणाशी ठाम आहे गेल्या वर्षी पण १५ ऑगस्ट २०२३ रोजी मला या विषया संदर्भात उपोषणास बसण्यास भाग पाडले होते. . त्यापासुन व त्याही आधीपासून आम्हां प्रकल्पग्रस्त शेतकरी यांना काही निर्णय मिळत नाही असे श्री. गावडे यांनी म्हटले आहे.

You cannot copy content of this page