जिल्हास्तरीय अधिकारी एकत्र आले तर प्रश्न निकाली निघू शकतात…

पालकमंत्री रवींद्र चव्हाण: जनता दरबारातील प्रश्न निकाली निघे पर्यंत पाठपुरावा केला जाणार..

⚡ओरोस ता.१२-: जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन पातळीवर लोकशाही दिन साजरा केला जातो. परंतु यातही अनेक प्रश्न सुटत नाहीत. हे प्रश्न सुटण्यासाठी तालुका ते जिल्हास्तरीय अधिकारी एकत्र आले तर प्रश्न निकाली निघू शकतात. त्यामुळे जनता दरबार ही संकल्पना आपण सुरू केली आहे. या माध्यमातून येणारे प्रश्न निकाली निघे पर्यंत पाठपुरावा केला जाणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जनता दरबार उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.
सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत पालकमंत्री चव्हाण यांनी जनता दरबाराचे आयोजन केले आहे. आज पहिल्याच दिवशी कणकवली विधानसभा मतदार संघासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. याचे उद्घाटन या मतदार संघाचे आ नितेश राणे यांनी दीप प्रज्वलन करून केले. यावेळी स्वतः पालकमंत्री चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, उप वनरक्षक नवल किशोर रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भाजपचे नेते ऍड अजित गोगटे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page