स्थानिक बी.एड. बेरोजगार उमेदवार संघटनेची कार्यकारिणी जाहीर…

⚡वेंगुर्ला ता.१२-: शिक्षक भरती प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक बी.एड. बेरोजगार उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने सभा आयोजित केली होती. या सभेत संघटनेची कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. यात अध्यक्षपदी रेश्मा शिरसाट यांची निवड करण्यात आली.

  उर्वरित कार्यकारिणीत उपाध्यक्ष-सौरभ पाटकर, सचिव-रणजित राणे, सहसचिव-श्रद्धा नाईक-साळगावकर, खजिनदार-श्रीराम कानसे, सहखजिनदार- पूजा मस्के, सल्लागार -सोनाली परब तसेच तालुका प्रतिनिधी औदुंबर वेजरे (सावंतवाडी), अपर्णा दीपनाईक (वेंगुर्ला), वैष्णवी चव्हाण, सुवर्णा प्रभू (कुडाळ), प्रदीप सोनार (कणकवली), सुवर्णा प्रभूखोत (मालवण), शांती सावंत (सावंतवाडी), ज्योत्स्ना कदम (देवगड), उज्ज्वला नाईक, भक्ती नाईक (दोडामार्ग) यांचा समावेश आहे.

  ‘स्थानिक भरती‘ या मुद्द्यावर एकत्रित येऊन पुढील कार्यवाही निश्चित करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष जी.एम.सामंत, सचिव काका मांजरेकर, सहसचिव योगेश राऊळ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्ह्यातील बहुसंख्य बी.एड उमेदवार उपस्थित होते.
You cannot copy content of this page