रमेश पिंगुळकर :मालवण तालुका देवळी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न.
मालवण दि प्रतिनिधी
विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात अविरत मेहनत व चिकाटीने प्रयत्न करावे प्रथम दर्शनी अपयश आले तरी चालेल मात्र खचून न जाता विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करावा असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश पिंगुळकर यांनी मालवण येथे बोलताना केले.
सिंधुदुर्ग जिल्हा देवळी समाज उन्नती मंडळ तालुका शाखा मालवण च्या वतीने विद्यार्थी सत्कार सोहळा वायरी मालवण येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून रमेश पिंगुळकर बोलत होते यावेळी व्यासपीठावर मालवण तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, सचिव विष्णू चौकेकर, खजिनदार मधुसूदन परुळेकर, सुदेश मालवणकर, श्यामसुंदर पोईपकर, संतोष देऊलकर हितेंद्र काळसेकर वसंत वराडकर बाबल नांदोसकर चंद्रशेखर फोंडेकर राजन दाभोळकर दीपक किर्लोसकर हरिचंद्र तळवडेकर उमेश श्रावणकर सतीश बांदिवडेकर न्हानु पेंडूरकर, विपुल माळगावकर, पूजा वेरलकर, देविदास वेरलकर, चंद्रकांत पेंडूरकर, बाबी कुणकवळेकर, सुधाकर वेंगुर्लेकर हनुमंत पाटकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी देविदास वेरलकर श्रीकृष्ण तळवडेकर चंद्रकांत पेंडूरकर शेखर फोंडेकर विष्णू चौकेकर व इतर समाज बांधवांनी आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच सर्पमित्र स्वप्नील परुळेकर क्रीडा परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या तृप्ती व दीप्ती तळवडेकर यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू चौकेकर प्रास्ताविक श्रीकृष्ण तळवडेकर व आभार शेखर फोंडेकर यांनी व्यक्त केले.
फोटो :-
1) मालवण तालुका देवळी समाज विद्यार्थी सत्कार सोहळ्यात बोलताना ज्येष्ठ पदाधिकारी रमेश पिंगुळकर सोबत श्रीकृष्ण तळवडेकर बाबी कुणकवळेकर सुधाकर वेंगुर्लेकर व इतर समाज बांधव.
2) मालवण येथे विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात उपस्थित तालुका देवळी समाजातील विद्यार्थी व देवळी समाज बांधव.
-अनिल तोंडवळकर
