कणकवली रेल्वे स्थानकाच्या शुशोभीकरणाचे झाले लोकार्पण…

कणकवली : मुख्य रस्ता ते कणकवली रेल्वे स्थानक पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आलेले सुशोभीकरण,गार्डन वेगवेगळी शिल्प, वेगवेगळ्या कलाकृती अशा प्रकल्पाचे लोकार्पण आजा शुक्रवार ९ ऑगस्ट रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,माजी आमदार अजित गोगटे,माजी आमदार राजन तेली,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नाईक,माजी नगराध्यक्ष समीर नलावडे,
कोकण रेल्वे कार्पोरेशन डायरेक्टर आर.के.हेगडे, वाघदत्त राव,अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री रावले,प्रादेशिक रेल्वे प्रबंधक श्री.कांबळे,रत्नागिरी विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक,कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड,माजी उप नगराध्यक्ष बंडू हर्णे, आदी सह अधिकारी,नेते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शंभर फूट उंच उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभावर तीस फुटी राष्ट्रध्वज आजच्या ९ ऑगस्ट क्रांती दिनी खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फडकवून लोकार्पण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी विंदाची राणीची बाग या बालउद्यानाचे फित कापून तसेच मुख्य प्रवेश द्वार,मंडप,शिल्प,या सर्वांचे अनावरण करून आणि दीपप्रज्वलन करून कणकवली रेल्वे स्थानकावरील प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले.

You cannot copy content of this page