माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड. परीमल नाईक यांनी केले आवाहन
*💫सावंतवाडी दि.६-:* सध्या राज्यासह देशात कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर स्वरूपाची असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण वाढत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनावर ताण येत असून, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे तसेच मास्क व सोशल डिस्टंसिंग या सारख्या नियमाचे पालन करावे असे आवाहन माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड. परीमल नाईक यांनी केले आहे. तसेच शासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या पंचसूत्री नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
