लायन्स क्लब मालवण आणि पाटीदार समाज यांच्या वतीने चिंदर सडेवाडी प्राथमिक शाळेस ग्रीन बोर्ड प्रदान…

मालवण दि प्रतिनिधी :

लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पाटीदार (पटेल) समाज यांच्या वतीने मालवण तालुक्यातील प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथे ग्रीनबोर्ड प्रदान करण्यात आला आला.

यावेळी लायन्स क्लब ऑफ मालवणचे अध्यक्ष महेश अंधारी, सेक्रेटरी फेणी फर्नाडीस, खजिनदार पल्लवी खानोलकर, जेष्ठ सदस्या जयश्री हडकर, मुकेश बावकर, पाटीदार समाजाचे शांती पटेल, मोहन पटेल उपस्थित होते. प्रशालेचे विद्यार्थी तसेच मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी जयश्री हडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
लायन्स क्लबच्या सामाजिक उपक्रमांची माहिती शिक्षक पालक यांना दिली. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे गाड सर यांनी आभार व्यक्त केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनेही सर्वांचे आभार मानण्यात आले.

यावेळी अंगणवाडी सेविका करिष्मा कानविंदे, मदतनीस मानसी गोसावी, पालक धनश्री गोसावी व विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.

You cannot copy content of this page