मंत्री दीपक केसरकर यांचे अमेझमेट पार्क कधी पूर्ण होणार…?

परशुराम उपरकर: पालकमंत्र्यांनी पाहुण्यांसारखं न येता जिल्ह्यात झालेल्या कामांची पाहणी करावी..

⚡सावंतवाडी ता.०७-: मंत्री दीपक केसरकर यांनी घोषणा केलेले अमेझमेट पार्क ते कधी पूर्ण करणार असा सवाल आज माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला असून, स्वतःच्या घरासोमर असणाऱ्या एस टी स्टॅन्ड येथील रस्त्यांवर पडलेले खड्डे दीपक केसरकर यांना दिसत नाहीत का? असे देखील विचारले आहे. जनतेची दिशाभूल करत केवळ निवडणूका जवळ आल्यावर दीपक केसरकर हे विकासाच्या घोषणा करतात परंतु, निवडणुका झाल्यानंतर त्या घोषणाच काय होत असा सवाल त्यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत विचारला आहे.

ते पुढे म्हणाले रेल्वे स्टेशन सुशोभिकरण केल्याची वा – वा कार्यकारी अभियंता, सर्व अधिकारी, पालकमंत्री दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ठेकेदार, अधिकारी, मंत्री हे मालामाल होत आहेत. पण जनता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर पाऊसात भिजत गाड्या पकडतात, हे दुदैवी आहे. रेल्वे स्टेशनच्या कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन बघाणार का असा सवाल श्री उपरकर यांनी केला आहे.दरम्यान प्रवासी रेल्वेत चढताना उतरताना प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्या प्लॅटफॉर्मवर ख-याअर्थाने सुशोभिकरण करण्याची गरज होती. अशी टीका माजी आ. परशुराम उपरकर यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले की एवढा मोठा खर्च करुन काम मिळवले ? ठेकेदाराची तुंबडी भरली. अधिका-यांना मलिदा मिळाला, आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री व बांधकाम मंत्री यांना झाला. बांधकाम मंत्र्यांनी आपला आणलेला कार्यकारी अभियंता यांच्या कामाचा कशा प्रकारे निकृष्ठ होतात हे आता जनतेला दिसून आले आहे.दरम्यान जिल्ह्यात येताना पालकमंत्र्यांनी पाहुण्यांसारखं न येता झालेली
कामांची पालकमंत्री, बांधकाम रविंद्र चव्हाण पाहणी करणार का ? असा सवाल माजी आ. परशुराम उपरकर यांनी केला.

You cannot copy content of this page