बिबवणेतील आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कुडाळ : तालुक्यात बिबवणे ग्रामपंचायत व कोकण कला शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत बिबवणे येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा १४७ ग्रामस्थानी लाभ घेतला. या वेळी ३५ ज्येष्ठांचे वयोश्री योजनेचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच बिबवणे पोस्ट कार्यालयाव्दारे शून्य बॅलन्सने खातीही उघडण्यात आली, तर प्राथमिक आरोग्य उपक्रेंद्रामार्फत आभा कार्ड बनविण्यात आली.


शिबिराचे उद्घाटन बिबवणे सरपंच सृष्टी कुडपकर यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ.संतोष सांवत, जनरल व आयुर्वेदीय डॉ. प्रणव प्रभु, स्त्री रोग तज्ञ डॉ. प्रियांका सावंत, फिजिओथेरपिस्ट डॉ. चैताली प्रभू, बिबवणे उपसरपंच दिपक सावंत, ग्रामपंचायत सदस्या आर्या मार्गी, कोकण कला शिक्षण संस्थेचे समीर शिर्के व सहकारी , प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या समूदाय आरोग्य अधिकारी शलाका चव्हाण, ग्रामसेविका अन्वी शिरोडकर, आरोग्य सेवक यशवंत गावडे (तुळसुली),आरोग्य सेविका इंदुमती परब (बिबवणे), आरोग्य सेविका ए.के. भर्तू (तुळसुली ), आशा सेविका रुची लाड, मदतनीस वैशाली मयेकर माजी सरपंच हेमांगिनी माळकर, बिबवणे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष राजाराम ओरोसकर, संस्था सचिव व लक्ष्मी नारायण विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक प्रकाश कुबल, शिक्षक श्री पाटील व शिक्षिका श्रीमती कोरगांवकर, कृषी विद्यालय (किर्लोस )चे विद्यार्थी ,ग्रामपंचायत कर्मचारी तृप्ती चव्हाण, संदेश नाईक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच सौ कुडपकर म्हणाल्या, एखादा आजार असल्यास त्याचे योग्य वेळी निदान व्हावे. जेणेकरून त्यावर वेळीच उपचार करता येतील. महिला आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालाविताना महिलाचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते आणि नंतर त्याचे रुपांतर मोठ्या आजारात होते. म्हणून या शिबिरात खास महिलांसाठी स्त्रीरोग तज्ञ बोलाविल्याचे त्यांनी सांगून ग्रामपंचायती मार्फत आम्ही घेतलेल्या आरोग्य विषयक व अन्य उपक्रमांना ग्रामस्थांचा चागला प्रतिसाद व सहकार्य मिळाल्याचेही त्या म्हणाल्या.
प्रास्ताविक ग्रामसेविका सौ शिरोडकर यांनी ,तर आभार श्री शिर्के यानी मानले. या उपक्रमाबाबत ग्रामस्थानी समाधान व्यक्त केले. या शिबिरात रुग्णांना साधारण ३० ते ३५ हजार रू ची औषधे मोफत देण्यात आली .मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया ओरोस येथील जिल्हा रुग्णालय किंवा डेरवण रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत केली जाणार आहे.

You cannot copy content of this page