प्रवीण कुबल यांना युवा संदेश आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर…

मालवण दि प्रतिनिधी
युवा सदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील शिक्षकांना दिला जाणारा ‘युवा संदेश आदर्श शिक्षक’ पुरस्कार यावर्षी माध्यमिक विभागातून वायरी भूतनाथ येथील रेकोबा हायस्कूलचे शिक्षक प्रवीण प्रभाकर कुबल यांना जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे वितरण रविवार ११ ऑगस्ट रोजी भगवती मंगल कार्यालय कणकवली येथे राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, व आम नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे

याच कार्यक्रमात प्राथमिक विभागातून विजय धर्मराज मस्के (जि. प. शाळा तुळस-वडखोल, ता. वेंगुर्ले) यांनाही आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम, असे आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कारमूर्तीचे प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जि. प. माजी अध्यक्षा सौ. संजना सदेश सावंत व युवा सदेश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा जि. प. चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी अभिनंदन केले आहे

युवा संदेश प्रतिष्ठानच्या तज्ज्ञ कमिटी मार्फत कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव न मागवता शालेय विद्यार्थी, पालक, शालेय परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी चर्चा करून आदर्श शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यावेळी सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा बक्षीस वितरणही होणार आहे

You cannot copy content of this page