रोजगारासाठी मुंबईत गेलेल्या तरुणाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू…

विशाल परब यांच्याकडून मदतीचा हात…

⚡वेंगुर्ले ता.०७-: तालुक्यातील वेतोरे वरचीवाडी येथील सर्वेश सुरेश गावडे हा कोकणातील अन्य तरुणांप्रमाणे रोजगारासाठी मुंबईत जाऊन कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धडपडणारा युवक. वडिलांचा दीड वर्षांपूर्वी अचानक मृत्यू झाल्याने घरची जबाबदारी आणखीनच वाढलेली. घरची परिस्थिती सुधारण्यासाठी काकांकडे रहात आयटीआय करून ठाण्यात एका खाजगी कंपनीत ॲप्रेन्टीसशिप करून नोकरीत कायम होणार अशी स्थिती असतानाच, विजेचा धक्का बसून सर्वेशने जगाचा कायमचा निरोप घेतला. आशेचा किरण दिसत असताना अचानकच हा दुर्दैवाचा धक्का गावडे कुटूंबाला बसला.

ही हृदयद्रावक परिस्थिती भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या कानावर जातात त्यानी गावडे कुटुंबीयांना धीर देत आपल्याकडून मदत म्हणून काही आर्थिक तरतूद गावडे परिवारासाठी करून दिली. भाजपा पदाधिकारी सरपंच मा.प्राची नाईक, माजी पंचायत समिती सदस्या सौ स्मिता दामले, साक्षी राऊळ, प्रवीण गावडे, विजय वालावलकर, तेजस जाधव, विक्रांत सावंत, प्रमोद मेस्त्री, गोटू राऊळ, जितेंद्र राऊळ, प्रशांत नाईक, सुजाता वालावलकर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी गावडे कुटुंबीयांची भेट घेत विशाल परब यांनी केलेली आर्थिक मदत त्यांच्याकडे सुपूर्द केली.

You cannot copy content of this page