बांदा नवीन मच्छी मार्केट इमारतीचे लोकार्पण सोहळा उद्या…

मंत्री रवींद्र चव्हाण व मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती: सर्वांनी उपस्थित रहावे;
भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांचे आवाहन.

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील आळवाडी येथे बांधण्यात आलेल्या नवीन मच्छी मार्केट इमारतीचे लोकार्पण गुरुवार दिनांक ८ रोजी दुपारी १२ वाजता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केले आहे.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, कणकवलीचे आमदार नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी या इमारतीचे लोकार्पण न केल्यास शिवसेनेच्या वतीने उदघाटन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मच्छी मार्केट इमारत हा शहरात चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर उद्या या इमारतीचे लोकार्पण होत आहे.

You cannot copy content of this page