⚡बांदा ता.०७-: अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ चा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
यापूर्वी देखील समर्थ याने राज्यस्तरावर वेशभूषा, निबंध लेखन स्पर्धेत यश मिळविले आहे. त्याला प्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, वर्गशिक्षिका रसिका मालवणकर, आई वडील सौ. राणी सागर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो :-
समर्थ पाटील.
