जामसंडे हायस्कूल येथील हस्ताक्षर स्पर्धेत अथर्व तेली श्रीजीत घाडी प्रथम…

देवगड (प्रतिनिधी) ६ ऑगस्ट २०२४-:विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुधारावे , विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी,लेखनाचा अधिक सराव व्हावा या उद्देशाने हस्ताक्षर स्पर्धेचे जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने आयोजित केली होती. या हस्ताक्षर स्पर्धेत प्राथमिक गटात कुमार अथर्व रवींद्र तेली व माध्यमिक गटात कुमार श्रीजीत अजित घाडी यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे .
ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली यामध्ये प्राथमिक गट प्रथम

अथर्व रवींद्र तेली, द्वितीय क्रमांक कुमारी तन्वी जयप्रकाश जाधव तृतीय क्रमांक स्वरा अजय तेली , उत्तेजनार्थ क्रमांक चिन्मयी योगेश भुजबळ तर माध्यमिक गटात प्रथम श्रीजीत अजित घाडी,द्वितीय क्रमांक: कुमारी आर्या सिद्धार्थ मणचेकर , तृतीय कुमारी छाया गंगाराम शिंदे, उत्तेजनार्थ कुमारी समृद्धी महेश लाड इत्यादी विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावली.
सर्धेचे परीक्षण कला शिक्षक श्री.मृत्युंजय मुणगेकर यांनी काम पाहिले.हस्ताक्षर स्पर्धा प्रमुख श्री. मंगेश रामचंद्र गिरकर यांनी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खूप मेहनत घेतली. यशस्वी विद्यार्थी , परिक्षक व मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक श्री . संजय गोगटे यांनी अभिनंदन केले आहे .

You cannot copy content of this page