आ केसरकर यांच्या निधीतून कामे करीत आपला बोलबाला करु नये;उपजिल्हा प्रमुख अशोक दळवी यांचा टोला
*💫सावंतवाडी दि.०६-:* नगराध्यक्ष संजू परब यांनी मर्यादेत राहून, चुकून जे पद मिळाले आहे त्याची शान राखावी उगाच वायफळ बडबड करू नये. असा जोरदार टोला शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी लगावला आहे. सावंतवाडी शहराच्या विकासासाठी आमदार दीपक केसरकर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असताना देखील त्यांच्याच निधीचा वापर करून आपणच विकास कामे केली असा बोलबाला ते करत आहेत. अशी टीका देखील त्यांनी केली आहे.
