विशाल परब: ५० व्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब पुष्पगुच्छ देत केक कापून दिल्या शुभेच्छा..
⚡सावंतवाडी ता.०३-: मनोज नाईक यांचा राजकीय अनुभव प्रदीर्घ आहे. सावंतवाडीकरांच्या मनात त्यांच्या प्रचंड जनसंपर्कामुळे आणि कामामुळे एक वेगळे स्थान त्यांनी कायमस्वरूपी प्राप्त केले आहे त्यांच्या अनुभवातून भारतीय जनता पार्टीचे एक शाश्वत स्वरूपाचे काम सावंतवाडी मध्ये उभे राहण्यास मदत झाली आहे त्यांच्यासारख्या सुवर्णस्पर्शी नेतृत्वाचा आज सुवर्णमहोत्सवी महोत्सव साजरा करताना सर्वानाच अतिशय आनंद होत आहे. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यच्या अनुभवाचा फायदा आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना नेहमीच व्हावा आणि त्या अनुभवातून भारतीय जनता पार्टी देखील सतत वाढत राहो हीच त्यांच्या आजच्या वाढदिवसानिमित्त शुभकामना व्यक्त करतो, अशा भावना भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केल्या आहेत.
भाजपाचे सावंतवाडी नगरपालिकेचे अभ्यासू नेतृत्व म्हणून ठसा उमटवलेले माजी नगरसेवक तथा भाजपा जिल्हा निमंत्रीत सदस्य मनोज नाईक यांचा आज ५० वा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस युवा मोर्चाच्या सावंतवाडी येथील कार्यालयात सर्व कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जल्लोषात साजरा करण्यात आला. युवा मोर्चा कार्यालयात विशाल परब यांनी वाढदिवसाचा केक कापून पुष्पगुच्छ देत मनोज नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी ॲड. अनील निरवडेकर, माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, माजी नगरसेवक आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, चराठा उपसरपंच अमित परब, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, केतन आजगांवकर, सैनिक पतसंस्था व्यवस्थापक प्रल्हाद तावडे, वेत्ये ग्रामपंचायत सदस्य जितू गावकर, बांदा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, औदुंबर पालव, वेत्ये बूथ अध्यक्ष गोविंद गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
