भंडारी हायस्कुल मालवणला १९९० च्या दहावी बॅचकडून डिजिटल बोर्ड प्रदान…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलच्या सन १९९० च्या दहावी बॅच च्या माजी विद्यार्थ्यांकडून भंडारी हायस्कुलला प्रदान करण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उदघाटन प्रशालेच्या प्रशालेचे माजी विद्यार्थी फिरोज पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. विविध सेवा सुविधा असलेल्या या डिजिटल बोर्डचा उपयोग विद्यार्थ्यांना अनेक शैक्षणिक उपक्रमात होणार आहे.

या डिजिटल बोर्डच्या उदघाटन प्रसंगी भंडारी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक हणमंत तिवले, सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र वराडकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर,सदस्य प्रकाश कुशे तसेच १९९० दहावी बॅचचे माजी विद्यार्थी फिरोज पटेल, सूर्यकांत कदम, विनोद गोलतकर, विनोद भोगावकर, किरण बावकर, महेश मालंडकर, शंकर वाघ आदी व इतर उपस्थित होते.

हा डिजिटल बोर्ड प्रदान करण्यासाठी १९९० च्या बॅच च्या वीस विद्यार्थ्यांनी आर्थिक योगदान दिले असून यामध्ये सध्या नैरोबी मध्ये अधिकारी असलेले संतोष मयेकर यांचे महत्वाचे योगदान राहिले. यावेळी चेअरमन सुधीर हेरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत यांनी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी दिलेल्या या योगदानाबद्दल कौतुक करून आभार मानले.

You cannot copy content of this page