कणकवली : कणकवली पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार रवींद्र सदाशिव बाईत यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे. रवींद्र बाईत यांची महाराष्ट्र पोलीस दलात ३२ वर्षे सेवा पूर्ण झाली असून ते १ जुलै १९९२ रोजी सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदी भरती झाले होते. पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार बाईत यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली असून त्यांचे अभिनंदन होत आहे.
रवींद्र बाईत यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी बढती…
