शिवसेनेचा ४ ऑगस्टला कुडाळमध्ये भजन महोत्सव…

कोकणातील नामवंत भजनी बुवा होणार सहभागी:रुपेश पावसकर यांनी दिली माहिती..

⚡कुडाळ ता.०२-: कुडाळ तालुका शिवसेना आयोजित आणि जिल्हा संघटक रुपेश पावसकर पुरस्कृत भजन महोतसव २०२४ चे आयोजन करण्यात आलं आहे. रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी सिद्धी विनायक हॉल कुडाळमध्ये हा भजन महोत्सव होणार असून त्यासाठी नामवंत भजनी बुवांची भजन भजरसिकांना ऐकायला मिळणार आहेत. याबाबत शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी आज पत्रकार परिषदेत माहिती दिली.


कुडाळ शिवसेना कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला शिवसेना जिल्हा भजन संघटना अध्यक्ष आणि या रामचंद्र परब, तालुका अध्यक्ष अरविंद करलकर, संजय भोगटे, प्रवक्ते रत्नाकर जोशी, संजय सावंत, विठ्ठल शिंदे, जयदीप तुळसकर, धर्मा सावंत उपस्थित होते. यावेळी बोलताना रुउपेक्ष पावसकर यांनी सांगितले कि सकाळी १० वाजता याभजन महोत्सवाचे उदघाटन होईल. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, उपाध्यक्ष सिंधुरत्न योजना किरण (भैया) सामंत, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर.जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्रीम. वर्षाताई कुडाळकर, तसेच शिवसेना पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुंबईसह कोकणातील नामवंत भजनी बुवा आपली कला या भजन महोत्सवात सादर करणार आहेत. सुमारे २०० भजनी कलाकार यावेळी उपस्थित राहतील असा अंदार्ज आहे. त्याच बरोबर दिवंगत भजनी बुवा के. ज्ञानु मर्गज, पांग्रड, कै. उदय गोखले, राजापूर आणि कै. सतिश शेजवलकर, कुडाळयाना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. जास्तीतजास्त संख्येने भजन रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन रुपेश पावसकर आणि रामचंद्र परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page