केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे सुयश…

⚡मालवण ता.०२-: शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी. एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे.

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेत सायली उदय गोसावी, माधवी लीलाधर तिरोडकर, वैष्णवी अनिल पाटकर, आकांक्षा शांताराम कासले व अक्षय सखाराम सातार्डेकर यांनी सुयश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांना प्रा. नागेश कदम, प्रा. रमेश वळवी यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे कॉलेजचे प्राचार्य हेमंत प्रभू तसेच कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर व सर्व कार्यकारिणी यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page