अपघात करून पळून गेलेल्या गाडी आणि चालकाचा कुडाळ पोलिसांकडून कडून छडा…

पिंगुळी-गुढीपुर येथे रिक्षाला दिली होती धडक:महाराष्ट्र शासनाच्या पत्तन विभागाची गाडी..

⚡कुडाळ ता.३१-: पिंगुळी गुढीपुर येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र 66 च्या सर्विस रोडवर रिक्षास महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या महिंद्रा बोलेरो गाडीने पाठीमागून धडक देऊन अपघात करून बोलेरो चालक गाडीसह पळून गेला होता.त्याचा छडा लावण्यात कुडाळ पोलिसांना यश आले आहे. ती गाडी महाराष्ट्र शासनाच्या पत्तन विभाग सिंधुदुर्गची असून त्याचा चालक प्रताप शंकर ठाकूर, रा. कोनाळकट्टा-दोडामार्ग हा असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या शनिवारी, .दिनांक २७ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र 66 चे सर्विस रोडवर पिंगळी गुढीपूर येथे रिक्षा क्र. MH.07.AH.0110 या रिक्षास महाराष्ट्र शासन असे लिहिलेल्या महिंद्रा बोलेरो गाडीने पाठीमागून धडक देऊन अपघात करून बोलेरो चालक पळून गेलेला होता. सदर अपघातात रिक्षाचालक व प्रवासी जखमी झालेले होते. त्याबाबत अज्ञात बोलेरो चालकाविरुद्ध कुडाळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. अपघात करून पळून गेलेले वाहन हे महाराष्ट्र शासनाचे असूनही वाहन चालक पळून गेल्याने नागरिकांच्या मध्ये रोष निर्माण झालेला होता. सदर अपघातात चे अपघात केलेल्या वाहनाचा शोध घेण्याचे पोलिसांना कुडाळ पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते . गुन्हयातील अज्ञात बोलेरो चालकाचा शोध घेण्याकरीता कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पोलीस पथक स्थापन केले होते . पोलिसांनी तपास करून अपघातग्रस्त वाहन निष्पन्न केले सदर बोललो गाडीचा क्रमांक MH 07.AG.7668 असा असून चालक प्रताप शंकर ठाकूर राहणार कोनाळकट्टा ता. दोडामार्ग हे आहेत सदरचे वाहन हे पतन विभाग, सिंधुदुर्ग या कार्यालयाचे आहे. असे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी सावंतवाडी विनोद कांबळे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शकाखाली पोलीस अंमलदार कृष्णा परुळेकर, सुबोध माळगावकर यांनी केली.

You cannot copy content of this page