व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान;संजू परब यांच्या कडून तात्काळ पाहणी;तर पावसाळ्या संपल्या तात्काळ दुरुस्ती करून देतो; मुख्याधिकाऱ्यांच आश्वासन..
⚡सावंतवाडी ता.३१-: येथील नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलनाच्या स्लॅबला गळती लागले आहे. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी गेलं असून व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान याबाबतची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भाजपच्या माध्यमातून आक्रमक भूमिका घेत तात्काळ मुख्याधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेत पाहणी केली. यावेळी आपण त्वरित पावसाळा संपल्यावर हे काम करून देतो असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी संजू परब व व्यापाऱ्यांना दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की आज गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेतील असलेल्या पालिकेच्या इंदिरा गांधी व्याकरण संकुलाळा गळती लागली आहे स्लॅब चे पाणी थेट दुकानांमध्ये असल्यामुळे तिथे असलेले कपडे भांडी आधी व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे याबाबत वारंवार लक्ष वेधून सुद्धा कोणीही लक्ष देत नाही असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे दरम्यान याबाबत घटनेची माहिती मिळताच संजू परब यांनी धाव घेत मुख्याधिकाऱ्यांचे उपस्थितीत पाहणी केली व पावसाळ्या नंतर हे काम आपण त्वरित करून देतो असा आश्वासन त्यांनी यावेळी दिले
यावेळी अजय गोंदावळे,माजी उपनगराध्यक्ष राजू बेग, उत्कर्ष सासोलकर आनंद नेवगी विनोद सचिन साठेलकर कुणाल शिंगारे ,गुरु वारंग, समीर पालव आदी यावेळी उपस्थित होते
