आम. वैभव नाईक यांच्यामार्फत मालवण शहरात डास प्रतिबंधक औषध फवारणी…

⚡मालवण ता.३०-: मालवण शहारात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून शहरात हत्तीरोग रुग्ण सापडून आल्याने डासांचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन स्तरावर योग्य उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम. वैभव नाईक यांच्या वतीने मालवण शहारात डासप्रादुर्भाव रोखण्यासाठी औषध फवारणी करण्यात येत असून मालवण फोवकांडा पिंपळ येथे ज्येष्ठ पदाधिकारी भाई कासवकर यांच्या हस्ते श्रीफळ ठेवून या औषध फवारणी मोहिमेची सुरवात करण्यात आली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख बाबी जोगी, माजी उपनगराध्यक्ष महेश जावकर, माजी नगरसेवक मंदार केणी, यतीन खोत, महेंद्र म्हाडगुत, भाई कासवकर, मनोज मोंडकर, बंड्या सरमळकर, उमेश मांजरेकर, सुहास वालावलकर, पॉली गिरकर, यशवंत चिंदरकर, साईनाथ वाघ, निनीश चव्हाण, राजेश वाघ, राजा इब्रामपूरकर, नाईक साटम यासाह अन्य उपस्थित होते.

नगरपरिषद प्रशासन योग्य उपाययोजना करण्यात कमी पडत असल्याचा आरोप यावेळी मंदार केणी यांनी करत आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून आता मालवण शहरात सर्वत्र औषध फवारणी व अन्य उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर नगरपरिषद स्तरावरून होणाऱ्या उपाययोजना बाबत नागरिक नाराज आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मागणी नुसार आम. नाईक यांनी ही डास फवारणी मोहीम सूरू केल्याचे यतीन खोत यांनी सांगितले.

You cannot copy content of this page