⚡मालवण ता.२९-: सिंधुदुर्ग परिवर्तन केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या टेक्सटाइल अपसायकलिंग व लाईफ सेव्हींग टेक्निक्स प्रशिक्षण वर्गातील प्रशिक्षणार्थीनी स्वतःच्या उपजीविका वृद्धीसाठी रोजगार उपलब्ध करावा आणि गावातील उद्योगाना चालना मिळावी यासाठी हडी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या उद्योग कार्यशाळेस नवउद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मानव साधन विकास संस्था अंतर्गत परिवर्तन केंद्रामार्फत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतुन, विद्यमान अध्यक्षा सौ. उमा प्रभू यांनी उपजीविका वृद्धीसाठी, वृद्धी प्रोजेक्ट मधून सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील ५० महिलांना टेक्सटाइल अपसायकलिंग मास्टर ट्रेनर्स म्हणून गेले नऊ महिने प्रशिक्षण दिले. या मास्टर ट्रेनर्सनी आपल्या संपर्कातील ४५० महिलांना टेक्सटाइल अपसायकलिंग या विषयातील प्रशिक्षण दिले आहे. तसेच सागरी किनार वस्तीतील १२० युवक, युवतींना भारत सरकारच्या एनआयडब्ल्यूएस या गोवा येथील संस्थेत ‘लाइफ सेव्हींग टेक्निक्स्’ व ‘पाॅवर बोट हँडलिंग’ प्रशिक्षण सिंधू-पुत्र प्रोजेक्ट मध्ये दिले आहे.
यावेळी मानव साधन विकास संस्था, परिवर्तन केंद्र संचालक व कन्फेडरेशन ऑफ इंडीयन इंडस्ट्रीजचे नंदकिशोर परब यांनी नवीन उद्योग करण्यासाठी उद्योजकाची मानसिकता, उद्योगाचे पूर्वनियोजन, उद्योग निर्मितीसाठी करावी लागणारी तयारी, उद्योगातील उत्पादित मालाला बाजारपेठ यासंबंधी मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत हडी गावातील काजू, आंबा, नारळ प्रक्रिया, मत्स्य पालन, पर्यटन या व्यवसायातील उद्योजक व इच्छुक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा समन्वयक विलास हडकर यांनी प्रास्ताविक केले.या कार्यशाळेत हडी गावातील काजू, आंबा, नारळ प्रक्रिया, मत्स्य पालन, पर्यटन या व्यवसायातील उद्योजक व इच्छुक उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी माजी सरपंच महेश मांजरेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेच्या आयोजनासाठी सागर गोलतकर, दर्शन गावकर, महादेव मुळीक, हर्षदा मांजरेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी मयूर करंगुटकर, किशोर नरे, दिनेश सुर्वे, महेश सुर्वे, नंदू रावले, गुरुनाथ गावकर, संकेत तोंडवळकर, विनोद मांजरेकर, वेदांती साळकर, मनाली पारकर, श्रध्दा गावकर, श्रध्दा वायंगणकर व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
