नांदगाव विभागातील वीज समस्यांबाबत कार्यकारी अभियंतांना ग्रामस्थांचा घेराव…

वीज समस्या ३० ऑगस्ट पूर्वी सोडवण्याच्या आश्वासनाअंती आंदोलन मागे..

⚡कणकवली ता.२९-: नांदगाव शाखा कार्यालय अंतर्गत येणा-या १२ गावांमध्ये वारंवार वीज खंडीत होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत नळयोजना वीज पुरवठा सुरळीत नसल्याने पाणी पुरवठा करताना अडचणी येत आहेत. वीज मीटर व वीजेची उपकरणे उच्चदाबामुळे जळून खाक होत आहेत. मान्सुन पूर्व झाडी कटींग न झाल्यामुळे वीजेच्या तारांवर झाडे कोसळत आहेत , अपघात झाल्यास जबाबदार कोण ? वीज बिले वाटप उशिराने का होतात ? अधिकारी व कर्मचारी ग्राहकांशी उध्दत बोलतात या सगळ्या प्रश्नांचा भडीमार करत वीज ग्राहकांनी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना जाब विचारत कनिष्ठ अभियंता पी. एस. पंडीत यांना धारेवर धरले. त्यावर प्रभारी कार्यकारी अभियंता श्री. बगडे यांनी संपुर्ण चर्चेअंती ३० ऑगस्ट पर्यंत वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर स्थगित करण्यात आले.

नांदगाव महावितरण कंपनीच्या विभागीय कार्यालयात प्रभारी कार्यकारी अभियंता विलास बगडे यांना नांदगाव दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी नांदगाव सरपंच भाई मोरजकर , असलदे सोसायटी चेअमन भगवान लोके यांच्या नेतृत्वाखाली घेराव घातला.

या आंदोलनात माजी जिल्हा परीषद बांधकाम सभापती नागेश मोरये , असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर , ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर , बेळणे सरपंच अविनाश गिरकर , नांदगाव माजी सरपंच पंढरीनाथ पारकर, ओटव सरपंच रुहीता तांबे, ओटव उपसरपंच दुर्गेश ओटवकर , तिवरे उपसरपंच श्री. वाळवे , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , उपसरपंच इरफान साटविलकर, तोंडवली बावशी माजी उपसरपंच अशोक बोभाटे, व्यापारी संघटना अध्यक्ष पप्पी सापळे, नांदगाव बावशी पोलीस पाटील समीर मयेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, कोळोशी पोलीस पाटील संजय गोरुले, कोळोशी शिवसेना शाखाप्रमुख संदीप शिंदे , माजी सरपंच श्री. अमृते , असलदे माजी तंटामुक्त अध्यक्ष बाबाजी शिंदे, महेश लोके , सोसायटी व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , माजी सरपंच सुरेश लोके , पोलीस पाटील पांडुरंग मयेकर ,ग्रा.प. सदस्य अक्षता खोत आदींसह वीज ग्राहक व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page