गेळे वासियांनी गाव बंदी करून केसरकरांना त्यांची जागा दाखवली…

राजन तेली: माझ्यावर हकालपट्टीचे कारवाई करणार होता त्याच काय झाल..?

⚡सावंतवाडी ता.२९-: केसरकरांच्या म्हणण्याप्रमाणे मी जरी लहान कार्यकर्ता असलो तरी मी चाकरमानी नाहि किंवा बोलच्चन गिरी करत नाही, आज गेळे सारख्या गावात ग्रामस्थ प्रसंगी तुम्हाला गाव बंदी करतात यावरूनच तुमच काम किती चांगल आहे हे गेळे वासियांनी दाखवून दिले आहे. असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी मंत्री केसरकर यांना लगावला.

दरम्यान आता निवडणूका जवळ आल्या आहेत त्यामुळे कोण लहान कोण मोठ हे येणाऱ्या काही दिवसात जनताच ठरणार आहे. अशी टिका करत ते माझ्यावर हक्कालपट्टीची कारवाई करणार होते त्याच काय झाल असा सवाल ही श्री.तेली यांनी यावेळी उपस्थितीत केला. ते आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषेदत बोलत होते.

You cannot copy content of this page