तिलारी प्रकल्पातील कालव्यांमधील गाळ पावसाळ्याच्या पूर्वी उपसा…

राष्ट्रवादी युवक काँग्रेस सावंतवाडीच्यावतीने तिलारी प्रकल्प उपविभागीय अभियंत्याकडे मागणी

*💫सावंतवाडी दि.०५-:* राष्ट्रवादी युवक काँग्रेस,सावंतवाडी च्या वतीने आज तिलारी प्रकल्प उपविभागीय अभियंता बाळासाहेब असगेकर यांची भेट घेतली होती. यावेळी तिलारी प्रकल्पातील कालव्यांमधील गाळ पावसाळ्याच्या पूर्वी उपसा करावे अन्यथा पावसात कालव्यांच्या लगतच्या गावांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच तिलारी प्रकल्पातील रिक्त पदे भरण्याबाबत व विविध विकासकामां विषयी चर्चा करण्यात आली आहे. यावेळी युवक विधानसभा अध्यक्ष शैलेश लाड , युवक तालुकाध्यक्ष राजू धारपवार, जिल्हाउपाध्यक्ष अर्षद बेग, युवक शहराध्यक्ष अभिजीत पवार, सदस्य परेश तांबोस्कर, प्रतीक सावंत, अमर धोत्रे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page