*💫सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था,कोकण विभाग, कोकण भवन नवी मुंबई,यांचेकडून कळविण्यात येते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी, प्राधिकृत अधिकारी यांची नामतालिका पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज सहकार खात्यातून विवृत्त झालेल्या वयाची 65 वर्षे पूर्ण न झालेल्या निवृत्त न्यायाधीश, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट यांचेकडून मागविण्यात येत आहेत. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, कोकण भवन, नवी मुंबई ,जिल्हा उपनिबंधक, सहकारी सेस्था, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सर्व तालुका उपनिबंधक सहाय्यक निबंधक, सह. संस्था यांचे कार्यालयात दिनांक 1 एप्रिल 2021 ते 30 एप्रिल 2021 या कालावधीत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. याबाबतची जाहीर सुचना उपरोक्त नमुद कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अशी माहिती यु.यु.यादव सहाय्यक निबंधक (प्रशासन) अधिन-जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था- सिंधुदुर्ग यांनी दिली आहे. 0000
चौकशी प्राधिकृत अधिकारी नामतालिका पॅनेल तयार करण्यासाठी अर्ज करावीत…
