आयटीआयच्या मुलांना घेवून वीज वितरणाला कर्मचारी पुरविणार…

मंत्री केसरकर यांचा बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन:सावंतवाडी मतदार संघातील वीज प्रश्न सोडविणार; केसरकर यांनी केले स्पष्ट..

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मतदारसंघात वीज वितरणच्या कार्यालयात कर्मचारी कमी असल्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यास काही अडचणी निर्माण होत आहेत. परतु जिल्हाधिकाऱ्यांना मी आता सूचना केल्या असून त्यानी देखील आयटीआय मुलांनच ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना तात्काळ आपण समाविष्ट करून घेऊन कर्मचारी येत्या दोन-चार दिवसात भरून वीज पुरवठ्याबाबत असलेली समस्या लवकरच दूर होईल अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली.

दरम्यान प्रत्येक डिव्हिजनला मी स्वखर्चाने गाड्या देखील उपलब्ध करून देण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न येत्या चार-पाच दिवसात मार्गी लागतील. मी पुन्हा एकदा आठवड्याभरात याबाबत बैठक घेणार असून आढावा घेणार आहे, अस ही श्री.मंत्री केसरकर यांनी यावेळी सांगितले.

ते पुढे बोलताना म्हणाले की, यावेळी प्रचंड पाऊस झाला असून पावसाबरोबर वारा देखील मोठा आहे. त्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडत आहेत. त्यामुळे जी धोकादायक झाडे असतील ती तात्काळ तोडण्याचे आदेश देखील दिले आहेत. ग्रामस्थांमध्ये याबाबत असलेला उद्रेक हा स्वाभाविक आहे. परंतु आठवड्याभरात या सर्व गोष्टी सुरळीत होवून वीज पुरवठाही पूर्वपदावर येईल, असे मंत्री केसरकर यांनी यावेळी आश्वस्त केले. दरम्यान शेतकऱ्यांचं झालेलं नुकसानी संदर्भात देखील पंचनामे युद्ध पातळ सुरू असून त्यांना देखील नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळेल असे श्री केसरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान पावसाळ्यापूर्वी बाजारपेठेतील बनवलेले रस्ते जे खराब झाले त्या कॉन्ट्रॅक्टरांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी आदेशही श्री केसरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले

You cannot copy content of this page