सोनुर्ली व रोणापाल जंगलात तमिळनाडूतील येथील महिला आढळली बांधून ठेवलेल्या स्थितीत…

गुराख्यामुळे प्रकार उघड ; पोलिस घटनास्थळी दाखल..

सावंतवाडी ता.२७-: रोणापाल सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीचे डोंगर या घनदाट जंगलात तामिळनाडूत येथील महिलेला अज्ञातांने लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याची घटना आज सकाळी सोनुर्ली येथील गुराखी व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. घनदाट जंगलात दोन ते तीन दिवस बांधून ठेवल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसतांना एवढ्या आतमध्ये तिला कसे व कोणी आणले हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांना कोणाचातरी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात आतमध्ये जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली. तिच्याकडे असलेल्या आधारकार्ड वरुन तिची ओळख पटली.

You cannot copy content of this page