इंदिरा गांधी व्यापारी संकुलनातील गाळ्यांच्या मुदत मर्यादा बाबत मनसेने वेधले मुख्याधिकाऱ्यांच लक्ष…

सावंतवाडी : इंदिरा गांधी व्यापारी संकुल येथील व्यापारी गाळ्यांच्या मुदत मर्यादेबाबत मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले.


निवेदनात सावंत यांनी म्हटले की, सावंतवाडी शहरामध्ये असलेल्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलमधील मुदत मर्यादा किती आहे ? तसेच सदर संकुला मधील काही गाळे हे भाडे तत्वावर दिलेले आहेत. तरी हे गाळे नगरपरिषदेच्या कोणत्या करारा अंतर्गत भाडेतत्वावर दिले आहेत. तसेच हे गाळे कोणाच्या नावावर आहेत व सध्या ते कोणाच्या ताब्यात आहेत या बाबत नगरपरिषदेकड़े काही माहिती आहे का? सदर संकुलचे बांधकाम ज्यावेळी करण्यात आले, अजूनही त्याच स्थिती मध्ये आहे का, याची खातरजमा नगरपरिषदेने केली आहे का? आमच्या असे निदर्शनास आले आहे कि काही गाळेधारकांनी मूळ बीम तोडून त्या ठिकाणी काम केले आहे. एखाद्‌या इमारती मूळ structure बदल केल्या मुळे
इमारतीला धोका होऊ शकतो. आणि हा फौजदारी गुन्हा आहे. या वर आपण काय कारवाई केली आहे किंवा या पुढे करणार आहात. याचा खुलासा करावा.
तसेच या संकुलामध्ये असलेल्या बॅ. नाथ पै नाट्यगृहाची पार्किंगची व्यवस्था कुठे केली या बाबत माहिती कृपया द्यावी व त्याचा नकाशा उपलब्ध करून द्यावा. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी, तसेच या बाबत सर्व माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला उपलब्ध करून द्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल…

You cannot copy content of this page