बांद्यात रविवारी महारक्तदान शिबिराचे आयोजन…

बांदा ता.२६-: रोटरी क्लब ऑफ बांदा, सार्वजनिक नवरात्र उत्सव कट्टा कॉर्नर बांदा, रोट्रॅक क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २८ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील आनंदी मंगल कार्यालयात सकाळी ९. ३० ते १ वाजेपर्यंत शिबीर संपन्न होणार आहे. सध्यस्थितीत पावसाळ्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्ताची नितांत आवश्यकता भासत आहे. त्यामुळेच रक्तदान शिबिराचे तातडीने आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page