देव्या सुर्याजी यांना तात्काळ नगरपरिषद प्रशासनाचे वेधलं लक्ष:आरोग्य कर्मचारी तात्काळ दखल घेत परिसर केला स्वच्छ..
सावंतवाडी : पावसामुळे गुळगुळीत झालेल्या फुटपाथवर घसरुन ज्येठ महिला जखमी झाली. याची माहिती सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांना मिळताच त्यांनी नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधलं. आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांनी तात्काळ यांची दखल घेत सफाई मित्रांच्या माध्यमातून परिसरात स्वच्छता केली.
शहरातील मोती तलाव काठावर पहाटे मॉर्निंग वॉक व सायंकाळी इव्हिनिंग वॉकला नागरीक येत असतात. यात ज्येष्ठांची संख्या अधिक असते. मागील चार दिवसांत झालेल्या पावसामुळे तलावाचा फुटपाथ बुळबुळीत झाला होता. याचा अंदाज न आल्याने शुक्रवारी सकाळी एक वृद्धा घसरून पडली. याबाबतची माहिती सुवर्णकार पावन चोडणकर यांनी सामाजिक कार्यकर्ते देव्या सुर्याजी यांना दिली. यानंतर नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांना सुर्याजींनी कल्पना दिली. न.प.च्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ फुटपाथवर ब्लिचिंग पावडर टाकत परिसर साफ केला. तसेच पावसाच्या दिवसात फुटपाथवरून चालताना काळजी घेण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आले आहे.
