युवा उद्योजक विशाल परब यांचा उपक्रम..
⚡बांदा ता.२६-: युवा उद्योजक विशाल परब यांच्या माध्यमातून बांदा गावातील सर्व शाळा आणि अंगणवाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्याच्या वाटपाचा शुभारंभ शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ठीक १० वाजता होणार आहे.
सकाळी १० वाजता पीमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं. १ येथे शुभारंभ कार्यक्रम होणार असून बांदा शहरातील मान्यवरांनी वेळीच उपस्थित राहण्याचे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर आगलावे यांनी केले आहे.
