कुडाळ, ता.२६: भारतीय जनता पार्टी आणि युवा उद्योजक गणेश कदम यांच्या वतीने माणगाव खोऱ्यातील शेकडो विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप करण्यात आले. वडोस हायस्कूल, नेरूळ हायस्कूल, पुळास शाळा, शिवापूर नंबर१, शिवापूर गव्हाळ, वसोली हायस्कूल, चाफेली शाळा, उपवडे शाळा व वसोलि प्राथमिक शाळा, मोरे शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी माजी सभापती मोहन सावंत, उद्योजक गणेश कदम, ग्रामस्थ शांताराम कदम, ग्रामपंचायत सदस्य संदीप कदम, मनोहर दळवी, तेजस शेडगे, सुधीर गुंजाळ, परेश बावकर, आकाश नाईक, अरुण राऊळ, हिरजी राऊळ आदी.भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
