विठ्ठल मंदिरात भजन स्पर्धेला संगीतमय वातावरणात सुरवात…

मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य: उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन..

सावंतवाडी ता.२६-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सप्ताह निमित्त येथील विठ्ठल मंदिरात आयोजित भजन स्पर्धेला संगीतमय वातावरणात सुरवात झाली. शिंदे शिवसेनेचे नेते तथा माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन पार पडले.


मंत्री केसरकर यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषय कार्यक्रमाने साजरा होतो.यावर्षी हे कार्यक्रम साजरे केले असतांना विधानसभा मतदार संघातील भजनी कलाकारांसाठी भजन स्पर्धेचे आयोजन ना.दिपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. २८ जुलै पर्यत तीन दिवस पार पडणाऱ्या या स्पर्धेत २२ भजन मंडळ सहभागी झाले आहेत. .

You cannot copy content of this page