रुपेश राऊळ: ठाकरे सेनेच्या माध्यमातून सोमवारी कुडाळ येथील वीज कार्यालयावर देणार धडक..
⚡सावंतवाडी ता.२६-: जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने ज्यांच्याकडे आहेत त्या लोकप्रतिनिधी वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडले आहेतजिल्ह्यात दोन कॅबिनेट मंत्री आहेत तर एक माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार असताना देखील जनतेच्या वीज प्रश्नावर हे सत्ताधारी नागरिकांना दिल्या दिलासा देण्यापासून अपयशी ठरले आहेत असा आरोप सावंतवाडी ठाकरे सेने विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी येथे केला आहे.
दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अनेक भागात वीजपुरवठा संदर्भात कुचकामी सरकारामुळे लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, त्यामुळे येत्या सोमवारी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून कुडाळ येथे सकाळी 11 वाजता वीस वितरण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारण्यात येणार आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
