मनसेच्या माजी तालुकाध्यक्षां सह युवा कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश…

⚡मालवण ता.२५-: मालवण चौके येथील युवा उद्योजक आणि मनसे माजी तालुकाध्यक्ष प्रितम विलास गावडे यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना (शिंदेगट) उपनेते तथा पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या उपस्थितीत मालवण येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे. आम. रवींद्र फाटक यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.

मालवण येथील दैवज्ञ भवन मध्ये आयोजित शिवसेना कार्यकर्ता बैठकीत हा पक्षप्रवेश करण्यात आला. शिवसेना माजी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख ऋत्विक सामंत, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी आम. रवींद्र फाटक, जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर, कुडाळ मालवण पक्ष निरीक्षक बाळा चिंदरकर, राजेंद्र फाटक, दीपक वेतकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख बबन शिंदे, उपाजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, खजिनदार भास्कर राणे, जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, तालुकाप्रमुख महेश राणे, महिला उपजिल्हाप्रमुख निलम शिंदे, शहर प्रमुख बाळू नाटेकर, युवासेना तालुकाप्रमुख मिहीर राणे, युवतीसेना शहरप्रमुख प्रियांका मेस्त्री, तालुका प्रमुख मधुरा तुळसकर, क्रांती धुरी, योगिता साळुंखे, कमलाकांत पारकर, अरुण तोडणकर, मेहुल धुमाळे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आम. फाटक यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करून संघटना मजबुतीत योगदान द्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्याद्वारे कार्यकर्त्यांनी जनसेवेच्या माध्यमातून सतत कार्यरत राहा, असे सांगितले.

यावेळी प्रितम गावडे यांच्या सोबत ओमकार चव्हाण, तथागत मालवणकर, राहुल मोंडकर, रोहन तावडे, प्रतीक गावडे, प्रमोद डिचवलकर, भरत सारंग, आनंद पराडकर, लौकिक मेथर, नितेश पराडकर, नितीन राठोड, आर्यन गवंडळकर, हेरंब जंगले, सर्वेश बागवे, ऋषिकेश मांजरेकर, जितेश हडकर, राज शेलटकर, संकेत आचरेकर, भाग्येश घाडीगावकर पार्थ डिचवलकर प्रथम शेलटकर, तेजस घारकर, प्रेम तोडणकर, लेवीस, सौरभ, लक्ष्मण मांजरेकर, समीर धुरी, केदार कवठकर दीपेश नांदोस्कर साहिल आचरेकर, मनोज आडीवरेकर, तेजस गोसावी, जयेंद्र लोणे, जॉन्टी फर्नांडिस, योगेश गुरव, विश्वजित खंदारे, रामचंद्र बांबर्डेकर, ओमकार गुंडे, आदित्य नाईक, एबल डिसिल्वा, सुनील मयेकर, अमित साळुंखे, प्रणय कांबळी, प्रेम लुडबे, अशोक कराडे, रोहन चिंदरकर, तनिष तेली, उत्तम पडते, मयुरेश चव्हाण, अश्विन चौकेकर, करण चव्हाण, युवराज खानोलकर, विघ्नेश कुमठेकर, सुनील मालवणकर, ओमकार गावकर, सातार्डेकर, ओमकार डिचवलकर, गौरव मिसाळ, करण कुमावत, शशांक महाजन यांसह अन्य युवा कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

You cannot copy content of this page