नांदोस येथील गणेश कुंडात बुडून तरुणाचा मृत्यू…

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील नांदोस सारंगवाडी येथील गणेश कुंड मध्ये पोहण्यासाठी गेलेल्या कट्टा वरची गुरामवाडी येथील प्रमोद दीपक गुराम (वय ३२) या तरुणाचा बुडून मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. रिक्षा व्यावसायिक असलेल्या प्रमोद याच्या अकाली निधनामुळे कट्टा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्रमोद गुराम हा गोविंद गोरे विनोद गुरव या मित्रांसोबत आज दुपारी नांदोस सारंगवाडी येथील गणपती कुंड येथे पोहण्यासाठी गेला होता. तो दारूच्या नशेत होता. त्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा कुंडातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यावेळी त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला असता घटनास्थळी ग्रामस्थ दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलीस उपनिरीक्षक एस.एस. खाडे, कट्टा दुरक्षेत्राचे पोलीस प्रकाश मोरे, के.जी. दळवी, पोलीस पाटील सूर्यकांत काळसेकर यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.

प्रमोद हा रिक्षा व्यावसायिक होता तर शेतीची कामेही करायचा. पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून होता. प्रमोद याचा अकाली मृत्यू झाल्याने कट्टा गुरामवाडी गावात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

You cannot copy content of this page