माजी सरपंच अनुप नाईक, संतोष परब यांनी केले नेतृत्व:आठ दिवसात समस्या सोडविण्याची महावितरणची ग्वाही..
⚡कुडाळ ता.२३-: तालुक्क्यातील हुमरस काही दिवसापासून विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वीज पुरवठा योग्य दाबाने नसणे, रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होणे,अशा घटनांनी त्रस्त ग्रामस्थांनी आज माजी सरपंच तथा एस.टी. कामगार सेना जिल्हाप्रमुख अनुप दयानंद नाईक,आणि माजी उपसरपंच तथा शिवसेना उपशाखाप्रमुख संतोष परब यांच्या नेतृत्वाखालील महावितरणचे कार्यालय गाठत अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला.
मागील एक महिनाभर हुमरस गावात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. कमी व्होल्टेज,रात्री अपरात्री लाईट जाणे,कामासाठी पूर्ण लाइन बंद ठेवणे यासारख्या गोष्टींमुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. त्यांनी ही गोष्ट हुमरस माजी सरपंच अनुप नाईक आणि उपशाखाप्रमुख संतोष परब यांच्या लक्षात आणून दिल्यावर तातडीने याची दखल घेत ग्रामस्थांना सोबत घेत महावितरण कार्यालय झाराप आणि कार्यकारी अभियंता कुडाळ यांच्या कार्यालयावर धडक दिली आणि ग्रामस्थांच्या अडचणींचा पाढा वाचला. त्यावर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या..सध्या हुमरस गावासाठी एकच कंत्राटी वायरमन उपलब्ध आहे,तो आपल्यापरीने दिवसरात्र काम करत आहे..
आज महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री. दिनोरे यांच्याशी झालेल्या चर्चेअंती झाराप येथील महावितरणचे अधिकारी तोंडले यांना पुढील ८ दिवसात लाइन क्लिअर करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच माणगाव सबस्टेशनला काही प्रॉब्लम झाल्यास सावंतवाडी वरून सप्लाय देऊन हुमरस गावचा विजपुरावठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जर याची अंमलबजावणी झाली नाही तर ग्रामस्थांच्या रोषाला महावितरणचे अधिकारी जबाबदार असतील असा इशार शिवसेना हुमरस शाखा वॉर्ड प्रमुख गुरुदास घोगळे यांनी दिला. यावेळी प्रकाश आरोनदेकर,दिनेश सडवेलकर,सागर परब,श्रीपाद साधले,शिरोडकर,बाळू नाईक आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते..
