डास निर्मळण्यासाठी उद्यापासून शहरात फवारणी…

पांडुरंग नाटेकर यांची माहिती; युवा रक्तदाता संघटनेच्या मागणीला यश..

सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी शहर रोगराई पासून दूर ठेवण्यासाठी नगरपालिकेमध्ये आज डास निर्मुलन मोहीमेसाठी नवीन फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या असून उद्यापासून शहरात डास फवारणी सुरू होणार आहे. याबाबतची माहिती पांडुरंग नाटेकर यांनी दिली.दरम्यान याबाबत युवा रक्तदाता संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले होते अखेर त्यांच्या मागणीला यश आल्या असून त्यामुळे शहरवासींकडून समाधान व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कीशहरवासीयांसाठी त्रासदायक असणारा डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी प्रशासनाच लक्ष वेधल होत. प्रांताधिकारी हेमंत निकम यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. दरम्यान, आज नगरपालिकेमध्ये डास निर्मुलन मोहीमेसाठी दोन हँण्डल मशीन्स व मोठ्या २ फॉगिंग मशीन्स दाखल झाल्या आहेत. शहर डासमुक्त करण्यासाठी ही प्रभावी मोहीम ठरणार आहे. युवा रक्तदाता संघटनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे‌. प्रांताधिकारी हेमंत निकम, मुख्याधिकारी सागर साळुंखे व सॅनिटरी इन्स्पेक्टर पांडुरंग नाटेकर यांचे संघटनेनं यासाठी आभार मानले आहेत. दरम्यान, शहरात उद्यापासून डास निर्मुलन फवारणीस सुरूवात होणार असल्याची माहिती न.प.चे सॅनिटरीइन्स्पेक्टर पांडुरंग नाटेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page