श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेला शैक्षणिक साहित्याची केली मदत…
⚡सावंतवाडी ता.२१-: शैक्षणिक वर्षात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.रविंद्रजी चव्हाण आणि खा.नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी
सावंतवाडी येथील श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप केले.
यावेळी विशाल परब यांच्यासमवेत माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर यांच्यासह श्री महालक्ष्मी दिव्यांग व निराधार सामाजिक संघटनेचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
