⚡मालवण ता.१७-: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवताळे मालवण येथील विद्यार्थ्यांना पाटीदार (पटेल) समाज व लायन्स क्लब ऑफ मालवण यांच्या वतीने स्कूल बॅग तसेच अन्य शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटपही करण्यात आले.
यावेळी पाटीदार समाजाचे शांती पटेल, अशोक पटेल, उर्मिला पटेल, बंशी पटेल, नयना पटेल यांसह लायन्स क्लबचे झोन चेअरमन विश्वास गांवकर, मालवण अध्यक्ष महेश अंधारी, मुकेश बावकर, वैशाली शंकरदास, फॅनी फर्नांडिस, पल्लवी तारी, दीक्षा गावकर यांसह अन्य पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
